सातारा प्रतिनिधी । सध्या लाडकी बहिणी योजना (Ladaki Bahin Yojana) राज्यामध्ये चर्चेचा भाग बनली आहे. आत्तापर्यंत या योजनेचे ६ हफ्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले असून सातव्या हप्त्याकडे बहिणींचे लक्ष लागून राहिले आहे. लाडक्या बहिणींच्या सातव्या हप्त्याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच महत्वाची घोषणा केली आहे. “अनेक महिलांमध्ये जानेवारीचा हप्ता (ladki Bahin Yojana) कधी मिळणार याबाबत प्रश्न होते. पण उद्या म्हणजेच 26 जानेवारी रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात ५ लाख १८ हजार ४५१ हुन अधिक लाडक्या बहिणींची संख्या आहे. या लाडक्या बहिणींसाठी हि नक्कीच आनंदाची बातमी आहे.
महायुती सरकारने महिलांसाठी सुरु केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत करत आहे . या योजनेअंतर्गत, अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती आणि त्यानंतर राज्यातील सुमारे 21 ते 65 वयाच्या 2 कोटी महिलांना लाभ मिळाला आहे. आत्तापर्यंत जुलै ते डिसेंबर 2024 पर्यंत 9 हजार रुपये प्रत्येक पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले होते. आता, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जानेवारी 2025 चा हप्ता जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
जानेवारी २०२५ महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. २४ जानेवारी २०२५ पर्यंत १.१० कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून, २६ जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी… pic.twitter.com/fU5dIUr8xe
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) January 24, 2025
आत्तापर्यंत किती महिलांना पैसे मिळाले?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जुलै ते डिसेंबर असे प्रत्येक महिन्याचे 1500 मिळून एकूण 9 हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यभराती सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजेनचा लाभ घेतला आहे. तर जानेवारीचा हप्ताही आता जमा होत असून सात महिन्यांचे मिळून एकूण 10 हजार 500 रुपये पात्र महिलांना मिळतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हफ्ता 25 डिसेंबरला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. तर जानेवारी महीना अर्धा उलटून गेला तरीही पैसे मिळाले नव्हते,त्यामुळे हे पैसे कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यासंदर्भात अदिती तटकरे यांनी गेल्या आठवड्यात माहिती दिली होती.
सातारा जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी
सातारा तालुका : ७६ हजार ४११ लाभार्थी
जावली तालुका : २० हजार ८४३ लाभार्थी
कोरेगाव तालुका : ५० हजार ५८० लाभार्थी
माण तालुका : ३४ हजार ८८५ लाभार्थी,
खटाव तालुका : ४८ हजार ८६८ लाभार्थी
वाई तालुका : ३६ हजार ७२५ लाभार्थी
खंडाळा तालुका : २३ हजार ८३२ लाभार्थी
महाबळेश्वर तालुका : १० हजार ५६९ लाभार्थी
फलटण तालुका : ५८ हजार ३७७ लाभार्थी
पाटण तालुका : ५९ हजार ११४ लाभार्थी
कराड तालुका : ९८ हजार २४७ लाभार्थी
एकूण लाभार्थी : ५ लाख १८ हजार ४५१
एकूण जमा झालेली रक्कम : ७७ कोटी ७६ लाख ७६ हजार ५०० रुपये