पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील कोयनानगर व पोफळी परिसराला बुधवारी दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी 2.8 रिश्टर स्केलंचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठेही नुकसान झाले नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना विभागात 13 किलोमीटर अंतरावर हेळवाक गावाच्या पश्चिमेला अंतरावर होता. या भूकंपाच्या धक्क्याची नोंद कोयना भूकंप मापन केंद्रावर करण्यात आलेली आहे.
भूकंपाच्या या धक्क्यामुळे परिसरात कुठेही कोणतीही हानी झालेली नसून कोठेही पडझड झाली नाही. दरम्यान, कोयना धरण परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात. या भूकंपांच्या धक्क्यांची रिश्टर स्केलवर तीव्रता कमी असल्यामुळे कोयना धरणाला कोणतीही हानी पोहचलेली नाही. या भूकंपाचा धक्का पाटण तालुक्यातील कोयनानगर तसेच शेजारील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्याच्या पोफळी परिसराला बसला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १३.६ किलोमीटर अंतरावर होता. तसेच या भूकंपाची खोली १५ किलोमीटर होती.
कोयना धरण पूर्णपणे सुरक्षित
कोयना धरण परिसरात झालेल्या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहचलेला नाही. धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण व्यवस्थापनाने दिला आहे. हा भूकंप कोयनानगरसह चिपळूण तालुक्यातील पोफळी, अलोरे या परिसरात देखील जाणवला. भूकंपाचा धक्का सौम्य असल्यानं तो दूरवर जाणवला नाही.
भूकंपाचा केंद्रबिंदू १३ कि. मी अंतरावर
कोयना परिसरात झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू धरणानजीकच्या हेळवाक गावाच्या पश्चिमेला १३ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची जमिनीतील खोली १५ किलोमीटर होती. भूकंपामुळे कोठेही पडझड झाल्याचे वृत्त नाही. तसेच कोयना धरणाला देखील धोका पोहचलेला नाही.
जानेवारीत झाला होता ३.१ रिश्टर स्केलचा भूकंप
कोयना धरण परिसरात लहान-मोठ्या भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरूच असते. त्यातील सौम्य धक्के हे जाणवत देखील नाहीत. या अगोदर २८ जानेवारी रोजी धरण परिसरात ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्याचा केंद्रबिंदू धरणापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावर होता.