सातारा प्रतिनिधी | गेल्या चोवीस तासांत महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक 104 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. तर काल कोयना धरणातून 1 हजार 50 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून 56.47 TMC इतका धरणातील पाणी साठा झाला आहे. कोयना धरणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात 126 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 78.35 अब्ज घन फूट पाणी साठा झालेला आहे. पावसामध्ये महाबळेश्वरबरोबरच सातारा तालुक्यात २३.५ मिलिमीटर, जावळीत ४४.०, पाटणमध्ये ६६.३, कऱ्हाड- २०.२, कोरेगाव- ८.६, खटाव- ६.९, माण- ६.१, फलटण- १.२, खंडाळा- ६.२, वाई-१९.३ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सध्या महाबळेश्वर, नवजा या भागात पावसाचा जोर कायम असून कोयना धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील मोठे, मध्यम प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धरणांमध्ये एकूण ७२.१९ अब्ज घनफूट पाणीसाठा असून, धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या ४८.४९ टक्के इतका असल्याची माहिती कृष्णा सिंचन विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
प्रकल्पातील पाणी साठ्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे…
मोठे प्रकल्प – कोयना –51.14 (51.08), धोम – 6.24 (53.38), धोम – बलकवडी – 3.36 (84.85), कण्हेर –4.47 (46.61), उरमोडी – 4.63 (47.98), तारळी – 4.96 (84.93). मध्यम प्रकल्प – येरळवाडी – 0.03(4.06), नेर – 0.08 (20.19), राणंद – 0.01 (4.42), आंधळी – 0.03 (12.98), नागेवाडी – 0.06 (26.67), मोरणा – 0.90(69.23), उत्तरमांड – 0.36 (41.86), महू – 0.85 (78.07), हातगेघर – 0.08 (33.72), वांग (मराठवाडी) – 1.14 (41.91) या प्रमाणे पाणीसाठा आहे.
प्रकल्पातील पावसाची नोंद…
मोरणा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्रात 107 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच धोम – 26 मि.मी., धोम – बलकवडी – 80, कण्हेर – 13, उरमोडी – 35, तारळी – 61, येरळवाडी – 4, उत्तरमांड – 60, महू – 24, हातगेघर – 43, वांग (मराठवाडी) – 21, नागेवाडी-6 मि.मी पाऊस झाला आहे. तर नेर, राणंद, आंधळी धरणाच्या क्षेत्रातील कालचा पाऊस निरंक आहे.