कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील १०९ उमेदवारांच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. दरम्यान कराड दक्षिण आणि कराड उत्तर विधानसभा मतदार संघात सातव्या फेरीच्या मतमोजणीस सुरुवात करण्यात आली असून यात कराड उत्तर मधून भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे आघाडीवर असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते बाळासाहेब पाटील पिछाडीवर आहेत तर कराड दक्षिणमधून चौथी फेरीत भाजप कडून डॉ. अतुलबाबा भोसले आघाडीवर असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर गेले आहेत.
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात चौथी फेरीत भाजप कडून डॉ. अतुलबाबा भोसले 2923 मताने आघाडीवर असून या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांना 5785 मते पडली आहेत. तर अतुल भोसले यांना 7098 मते पडली आहेत. कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडे 15 हजार 715 मत मिळवून आघाडीवर आहेत. आठव्या फेरीत मनोज घोरपडे यांना 6071 मते पडली असून बाळासाहेब पाटील यांना 3697मते मिळाली आहेत. या ठिकाणी एकूण 21547 मतांची घोरपडे यांना आघाडी आहेत.
चौथी फेरीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना मिळालेली 5785 मिळाली असली तरी डॉ अतुलबाबा भोसले यांना मिळालेली मते 7 हजार 98 मते मिळाली आहेत. आकंदरीत कराड उत्तर आणि कराड दक्षिण मतदार संघात भाजप आघाडीवर असल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे.