कराड प्रतिनिधी । उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र शरद पवार गटाकडून राज्याचे माजी सहकार मंत्री व विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपचे मनोज घोरपडे असा सामना रंगला. बाळासाहेब पाटील आतापर्यंत पाच वेळा कराड उत्तरचे आमदार राहिलेत. मात्र, यावेळेस त्यांचा महायुती भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी दारुण प्राभाव केला आहे. उत्तरेत पंचवीस वर्षे असणारी बाळासाहेब पाटील यांच्या सत्तेला मनोजदादांनी सुरुंग लावला आहे. या ठिकाणी मनोधैर्य एकवटल्याने हे शक्य झाले असून या कराड उत्तर मतदार संघात कमळ फुलले आहे. कराड उत्तर विधानसभा निवडणुकीत मनोज घोरपडे यांना एकूण 1 लाख 34 हजार 626 मते पडली तर बाळासाहेब पाटील यांना 90 हजार 935 मते पडली.
मनोज घोरपडे यांनी घेतलेलं सुरुवातीपासूनच लीडवर
बाळासाहेब पाटील यांच्या विरुद्ध उमेदवार देण्यासाठी जागा मिळावी यासाठी महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, ही जागा भाजपकडे गेली. भाजपमध्ये याजागेसाठी मनोज घोरपडे यांना मिळाली. आणि घोरपडे यांनी आपला करिष्मा दाखवला. त्यांनी मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आपले लीड कायम राखून ठेवले. सुरुवातीपासून पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत लीड कायम ठेवत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा बालेकिल्ला असलेला कराड उत्तर विधानसभा मतदार संघ आपल्याकडे खेचून आणला.
बाळासाहेब पाटील राहिले होते कराड उत्तरचे पाच टर्म आमदार मात्र, सहाव्याला पराभूत
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची फेररचना होण्यापूर्वी 1999, 2004,या विधानसभा निवडणुकांमध्ये बाळासाहेब पाटील विजयी झाले होते. तर, 2009 ला मतदारसंघांची फेररचना झाली होती. त्यानंतरच्या पुढील तीन निवडणुका बाळासाहेब पाटील यांनी जिंकल्या. 2009 ला राष्ट्रवादी काँग्रेसनं बाळासाहेब पाटील यांच्या ऐवजी अतुल भोसले यांना उमेदवारी दिली होती. मात्र, बाळासाहेब पाटील यांनी ती निवडणूक अपक्ष म्हणून लढवली आणि जिंकली. त्यानंतरच्या दोन निवडणुका बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिंकल्या होत्या. मात्र, यावेळेस बाळासाहेब पाटील यांचा मनोज घोरपडे यांनी चांगलाच दारुण पराभव केला.
‘मनोधैर्य’ एकवटलं अन् बाळसाहेबांचा झाला करेक्ट कार्यक्रम!
कराड उत्तर विधानसभा मतदार संघात राष्ट्र्रवादी शरदचंद्र शरद पवार गटाकडून बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपचे मनोज घोरपडे असा सामना झाला. बाळासाहेब पाटील आत्तापर्यंत पाचवेळा कराड उत्तरचे आमदार राहिले होते. मात्र, यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी खरोखरच सोप्पी गेली नाही. या ठिकाणी ‘मनो”धैर्य’ एकवटल्याने बाळासाहेबांना या निवडणुकीत चांगलंच पराभवाचा सामना करावा लागला. मतदारांची नाराजी असणं आणि मतदारसंघात भाजपचं तयार झालेलं वातावरण यामुळे उत्तरेत यंदा कमळ फुलले. या ठिकाणी ‘मनोधैर्य’ एकवटलं आणि बाळासाहेब पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम झाला.