सहकार मंत्र्यांनी काय दिवे लावलेत हे जनतेने पाहिलेय; मनोज घोरपडेंची आ. बाळासाहेब पाटलांवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । गेली 25 वर्षे झाली हणबरवाडी, धनगरवाडी योजना रखडवण्यात आली होती आमी आताच्या सरकारच्या काळात ती रखडल्याचा आरोप केला जात आहे. वास्तविक या योजनेचे काम पूर्ण होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले मात्र, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढे आलो. आता योजनेचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्याने काही दिवसांमध्ये याची चाचणी होणार आहे. योजना अपूर्ण असताना जिल्ह्यातील सहकार मंत्र्यांनी काय दिवे लावले, हे सगळ्या जनतेने पाहिले आहे. आता आपली ओळख बिन कामाचा आमदार झाली असल्याची घणाघाती टीका भाजपचे कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे यांनी आ. बाळासाहेब पाटील यांच्यावर केली

कराड येथील शासकीय विश्रामगृहात आज मोदी@9 या कार्यक्रमांतर्गत कराड उत्तर मधील पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत खासदार अमर साबळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी रामकृष्ण वेताळ, महेशबाबा जाधव, भीमराव (काका) पाटील, सागर शिवदास, अंजली जाधव, चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार, शंकरराव शेजवळ, दिपाली खोत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंत जेवढ्या योजना देशात आणल्या त्यांचा प्रत्येक घरामध्ये लाभार्थी आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचून आपल्याला केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचवून त्याची जनजागृती करायची आहे. एवढं काम केलं तरी या ठिकाणी बदल निश्चित होणार असल्याचे खासदार अमर साबळे यांनी यावेळी सांगितले.