सातारा प्रतिनिधी । राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी आज फलटणमध्ये विजय निर्धार सभा घेत भूमिका स्पष्ट कर विरोधकावर निशाण साधला. आजच्या मेळाव्यासाठी साडे तीन लाख रुपये गोळा झाले. आणि खर्च जेवणासह २ लाख १० हजार रुपये झाला. हाच कार्यक्रम जर भाजप किव्हा काँग्रेसला घ्यायचा असता तर १ कोट रुपये खर्च केले असते. मी निवडणुकीत उभा राहिलो आणि खासदार झालो तर तुमच्या सोन्याच्या चुली होतील असे काही नाही. परंतु मला खासदार होणे का गरजेच वाटतंय? हे सांगण्यासाठी आज हा मेळावा घेतला आहे. मी कधीच आमदारकी लढली नाही आणि लढणार देखील नाही. मी झालो तर खासदारच होणार आहे. माझी भूमिका हि मेणबत्ती सारखी आहे. मी जळत राहिलो पण प्रकाश मात्र शेतकऱ्याला मिळत राहील, असे जानकर यांनी म्हंटले.
यावेळी जानकर (Mahadev Jankar) पुढे म्हणाले की, मी कुठल्या पक्षाचं तिकीट मागायला जाणार नाही तर तिकीट देणारा मी नेता आहे. या जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय यशवंतराव चव्हाण यांनी देखील केले. ते पुढे जाऊन नेते बनले. परंतु मला सुदैव असं मिळालं कि मला पक्ष बनून मला त्याच पक्षाचा आमदार, खासदार होण्याचं भाग्य मिळाला हा माझा आणि यशवंतराव यांच्यातील फरक आहे.
आपल्याला आमदार, खासदार, मुख्यमंत्री आणि कोणत्याही खात्याचे मंत्री होता येतंय पण कोणत्या तरी पक्षाचा झेंडा घेऊन. पण मी तुमच्या स्वाभिमानावर तुमच्या तना, मनावर पक्षाचा झेंडा तयार केला. तो महात्मा फुले यांच्या गावात तयार केला आणि तो अखेरपर्यंत घेऊन जाण्याचा मी विढा उचललेला आहे. मला माढयातून १ लाख मते दिली. परंतु मी पंधरा वर्षात काय केलं? ते कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत हा तुमचा झेंडा देशाच्या गाडीपर्यंत नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मी मंत्री असताना तीन खाती होती पण खाती असताना मी १ रुपयांचा भ्रष्टाचार कधी केलेला नाही हि शपथ घेऊन सांगतो, असे जानकर यांनी यावेळी म्हंटले.
आज महादेव जानकर यांनी सुरुवातीला शिंगणापूर येथील शंभूमहादेवाचे दर्शन घेऊन चारचाकी वाहनांची रॅली काढली. शिंगणापूर-कोथळे- जावली- मिरडे- वडले- सोनवडी- सोनवडी बुद्रुक- कोळकीमार्गे ही रॅली मेळाव्याच्या ठिकाणी दाखल होत निर्धार मेळावा घेतला. या मेळाव्यास मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.