महाबळेश्वर-तापोळा रस्ता खचल्याने आता ‘या’ पर्यायी मार्गाने करता येणार प्रवास

0
2231
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मुसळधार पावसाने महाबळेश्वरमध्ये धुवांधार सुरूवात केल्यामुळे ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर झोळखिंड हद्दीत रस्ता खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहार. वन विभागाच्या हद्दीत महारोळा खालच्या बाजूस नवीन पाणीप्रहाव निर्माण झाला आहे. तसेच याच लांबीत मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्यामळे व नवीन तयार झालेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे 40 मी लांबी व 5 मी रुंदीचा नवीन डांबरी रस्ता रस्ता खचला व वाहून गेला आहे. वाहतूक बंद झाल्याने स्थानिक प्रशासनाच्या वतीने पर्यायी मार्ग सुरु करण्यात आला आहे. मांघर पारुट मार्गे झोळाची खिंड या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्वीनी पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील वाई, महाबळेश्वर, सातारा, जावली, पाटण, कराड या तालुक्यांमध्ये गुरुवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. संततधार सरी कोसळत असून, या पावसाने ठिकठिकाणी नुकसान केले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा मुख्य मार्गाचे काम काहीच महिन्यांपूर्वी पूर्णत्वास गेले होते. पहिल्याच जोरदार पावसात हा रस्ता अक्षरशः वाहून गेला. यामुळे ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तापोळा रस्त्यावरील चिखली शेडपासून काही अंतरावर मुख्य रस्ता दोन ठिकाणी खचला आहे. रस्ता दरीच्या दिशेला वाहून गेला आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे या मार्गावरील वाहतूक आता पर्यायी मांघर मार्गाने सुरू करण्यात आली आहे. तर दरड कोसळून माती, झाड मुख्य रस्त्यावर आले होते. जेसीबीच्या मदतीने दरड हटवण्याचे काम बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले.

दरड हटवण्याचे काम सुरु असताना मोठ्या प्रमाणावरील पावसामुळे या कामात अडथळा निर्माण होत आहे. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर लँड स्लाईड होत असल्यामुळे कुठलाही अपघात होऊ नये, या हेतूने मांघर पारुट मार्गे झोळाची खिंड अशी वाहतूक वळविण्यात आली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनी काळजी घ्यावी, घाबरू नये, असेही आवाहन पाटील यांनी केले आहे.