5 जणांनी केली बकऱ्यांची चोरी, 24 तासात आवळल्या मुसक्या, दोघे निघाले अल्पवयीन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । बकऱ्यांची चोरी करणाऱ्या संशयितांच्या लोणंद पोलिसांनी 24 तासाच्या आत मुसक्या आवळल्या. चोरून नेलेल्या बकऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेल्या स्विफ्ट कारसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ओंकार अशोक खुंटे, करण विनोंद खुंटे, सुरज ऊर्फ चिंग्या संतोष खुंटे आणि दोन अल्पवयीन मुलांचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे.

लोणंद पोलीस ठाण्याच्या हददीतील आंदोरी (ता. खंडाळा) गावातून ४५ हजार रुपये किमतीच्या तीन बकऱ्यांची चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशिल भोसले यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश होणे प्रकटीकरण शाखेला दिले होते.

बकरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित हे आंदोरी (ता. खंडाळा) गावात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती सहायक पोलीस निरिक्षक सुशील भोसले यांना मिळाली. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. गुन्हे प्रकटीकरण पथकाने यातील तीन आरोपींना गुन्ह्यात वापरलेल्या स्वीप्ट कारसह ताब्यात घेतले.

आरोपींकडे विचारपुस केली असता आंदोरी गावच्या हद्दीतील खुरी नावच्या शिवारातुन तीन बकऱ्यांची चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. चोरलेल्या बकऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेली स्वीप्ट कार, असा एकूण ५ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.