सातारा प्रतिनिधी | अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या शाहूनगर परिसरात गेल्या चार दिवसांपासून बिबट्याचा वावर आआहे. त्यामुळे येथील परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शाहूनगरमधील मंगळाई कॉलनीमध्ये तीन वेळा स्थानिक नागरिकांना बिबट्या दिसला. या परिसरातील पेरेंट स्कूल जवळून कुत्र्याचे पिल्लू बिबट्याने पळवले होते. छत्रपती शिवाजी कॉलनीत देखील नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडले. या परिस्थितीमध्ये नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. दरम्यान, अजिंक्यतारा परिसरात अनेकदा बिबट्या आढळून आला होता. किल्ल्यावर बडी फिरायला गेलेल्या लोकांना दक्षिण दरवाज्याच्या बाजूस अनेकदा बिबट्याचे दर्शन घडले आहे.
किल्ल्याच्या टोकापासून पायथ्यापर्यंत घनदाट देवी जंगल असल्याने बिबट्याला या ठिकाणी लपण्यासाठी मुवा अनेक जागा आहेत. खिंडवाडी येथे किल्ल्यावरुन कले खाद्याच्या शोधात आलेल्या तीन बिबट्यांचा महामार्गावर वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यामुळे किल्ल्यावर बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे अनेकदा अधोरेखित झाले आहे. आता तर नागरी वस्तीमध्येच बिनधास्तपणे बिबट्या फिरत असल्याने सकाळी लवकर आणि रात्री अपरात्री घरी परतणाऱ्या नागरिकांची चिंता वाढली आहे.
बिबट्या कुठूनही हल्ला करू शकतो. कंपाऊंड ओलांडून अपार्टमेंट तसेच बंगल्याच्या आत येऊ शकतो, असे नागरिकांना वाटत असल्यामुळे अनेकांनी पाळीव कुत्र्यांना रात्रीच्या वेळी सुरक्षित ठिकाणी ठेवणे सुरू केले आहे. वन विभागाने याची दखल घेवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.