सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील शिवथर गावच्या हद्दीत धनगर वस्तीत अचानक एका बिबट्याने कुत्र्यावर हल्ला. शिवथर परिसरात बिबट्या आल्याने गावातील परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी ज्या ठिकाणी बिबट्या हाेता त्याला तेथून हुसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्या झाडावर चढला. त्यानंतर ग्रामस्थांनी बिबट्याची माहिती वनविभागाला दिली. घटनास्थळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात येऊन पाहणी केली असता बिबट्याने झाडावरून पुन्हा शेतात धूम ठोकली. यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शेतकऱ्याने झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ आर्थिक स्वरुपात मिळावी, तडे बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.