साताऱ्यात उद्या लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान सोहळा; मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सातारा जिल्ह्याने उल्लेखनिय काम केले आहे. या योजनेचे 5 लाख 21 हजार 83 एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 5 लाख 13 हजार 418 इतक्या अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रम उद्या रविवार दि. 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12.15 वाजता सैनिक स्कूल मैदान येथे आयोजित करण्यात आला असून त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बाल विकास विभाग मंत्री आदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

दि. 17 ऑगस्टपासून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा प्रत्येकी प्रतिमाह 1 हजार 500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेंतर्गत सुमारे 50 हजार महिलांचा मेळावा रविवार दि. 18 ऑगस्ट रोजी सैनिक स्कूलच्या मैदानावर होणार आहे.