पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पाऊस वाढल्याने कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. रविवारी कराड तालुक्यातही पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे कोयना धरण 99.13 टक्के भरले असून धरणात 104.38 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
सद्या कोयना धरण पायथा विद्युत गृहामधून 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 11 हजार 394 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात रविवारी पावसाने हजेरी लावल्याने आज सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात 104.38 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तसेच 100 टक्के धरण भरले आहे. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांतही चांगला पाऊस झाला आहे. धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी ही मोठी धरणे भरली आहेत.
Koyna Dam
Date: 09/09/2024
Time: 08:00 AM
Water level: 2162’10” (659.232m)
Dam Storage :
Gross: 104.38 TMC (99.17%)
Live: 99.26 TMC (99.13%)
Inflow : 12,620 Cusecs.
Discharges
Radial Gate: 9,297 Cusecs.
KDPH: 2,100 Cusecs.
Total Discharge in koyna River: 11,397 Cusecs
Rainfall in mm – (Daily/Cumulative)
Koyna- 21/5238
Navaja- 54/6351
Mahabaleshwar- 14/6013