कोयना धरण 89.49 टक्के भरले; 94.19 TMC जमा झाला पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । गत आठवडाभरापासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात तसेच कोयना धरणक्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणाचा पाणीसाठा 94.19 टीएमसीवर पोहोचला. तर धरण भरण्यासाठी आता 8 टीएमसीची पाण्याची गरज आहे.

सातारा जिल्ह्याच्या पूर्व तसेच पश्चिम भागात पावसाला सुरूवात झाली आहे. शुक्रवारी पश्चिम भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. दोन दिवसपासून पावसाने उघडीप दिली आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, तापोळा, बामणोली भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे. पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली असून शुक्रवारी सकाळ पर्यंत 2154’11” इतकी धरणातील पाणी पातळी झाली आहे.

Koyna Dam
Date : 06/10/2023
Time : 08:00 AM
Water level : 2154′ 11″ (656.819m)

Dam Storage:
Gross: 94.19 TMC (89.49%)
Live: 89.07 TMC (88.95%)

Inflow: 270 cusecs

Discharges
KDPH : 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs

Rainfall in mm: (Daily/Cumulative)
Koyna: 00/3993
Navaja: 00/5614
Mahabaleshwar: 00/5448