पाटण प्रतिनिधी | कोयना धरणात यंदा ९१ टीएमसी पाणीसाठा होता. पैक ६७ टीएमसी पाणी विद्युत निर्मितीसाठी वापरले जाणार होते. आतापर्यंत ५८ टीएमसी पाणी वापरले गेले आहे. त्यामुळे सध्या कोयना धरणात २८.३९, तर चांदोली धरणात १३.२६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.
यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला तरी ३० जूनपर्यंत टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना चालवता येतील एवढे पाणी हाताशी आहे. विद्युतनिर्मितीच्या पाण्यात ८ टीएमसीची कपात आणि पाणी वाटपाबाबत गेल्या दोन महिन्यांत काटेकोरपणा राखत पाटबंधारे विभागाने दुष्काळाचे संकट हाताळले आहे.
कोयना धरणात यंदा ९१ टीएमसी पाणीसाठा होता. पैक ६७ टीएमसी पाणी विद्युत निर्मितीसाठी वापरले जाणार होते. आतापर्यंत ५८ टीएमसी पाणी वापरले गेले आहे. प्रकल्पांसाठी ४२.७० टीएमसी एवढी तरतूद आहे. पैकी ‘टेंभू’साठी १५.७१, ‘ताकारी’साठी ५.२५, ‘म्हैसाळ’साठी १३.५३ टीएमसी पाणी उपसले गेले आहे.३० जूनपर्यंत कोयनेतून ७.५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. त्याचवेळी चांदोली धरणात १३.२६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. पैकी ६.३८ टीएमसी साठा वापरायोग्य आहे.