पावसाने घेतली विश्रांती; कोयना धरणाचे दरवाजे 12 दिवसानंतर बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागासह प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला असून कोयना धरणात देखील पाणीसाठा हळूहळू होऊ लागला आहे. दरम्यान, आज मंगळवारी १२ दिवसानंतर कोयना धरणाचे दरवाजेही बंद करण्यात आले. सध्या धरणाच्या पायथा वीजगृहातूनच २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद नवजाला ९४ मिलिमीटर झाली आहे.

जुलै महिना उजाडल्यानंतर पावसाने थैमान घातले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस आॅगस्ट महिना उजाडेपर्यंत सुरू होता. यामध्ये जुलैच्या मध्यावर सलग १० दिवस पश्चिम भागात पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे दरडी कोसळल्या, ओढे-नाल्यांना पूर आले. यामध्ये काहींना आपला जीवही गमवावा लागला. परिणामी पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच धरणांतील पाणीसाठाही वेगाने वाढला. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करावा लागलेला.

मंगळवारी सकाळपासून सायंकाळपर्यंतच्या कोयनानगर येथे फक्त 06 मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. तर नवजा येथे 20 आणि महाबळेश्वरला 11 मिलिमीटर पाऊस झालेला आहे. पश्चिम भागातीलच धोम, बलकवडी, तारळी, कण्हेर, उरमोडी या प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झालेला आहे. त्यामुळे आवकही कमी प्रमाणात होत आहे.

Koyna Dam
Date: 06/08/2024
Time: 05:00 PM
Water level: 2148’03” (654.787m)

Dam Storage:
Gross: 86.34 TMC (82.03%)
Live: 81.22 TMC (81.11%)

Inflow : 17,270 Cusecs.

Discharges
Radial Gate: 00 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.

Total Discharge in koyna River: 2100 Cusecs

Rainfall in mm- (Daily/Cumulative)
Koyna- 06/4180
Navaja- 20/4887
Mahabaleshwar- 11/4641