कोयना धरणाचे दरवाजे 2 फुटांवर; 21 हजार क्युसेक पाण्याचा नदीत विसर्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने आज उघडीप दिली असून मात्र, गेल्या दोन दिवसात कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला चांगली मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात पाण्याची आवक कायम असल्याने दरवाजे दोन फुटांवर स्थिर आहेत. त्यामुळे दरवाजे आणि पायथा वीजगृह असे मिळून २१ हजार क्युसेक पाणी विसर्ग होत आहे.

आतापर्यंत माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात दमदार पाऊस पडला आहे. तर पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात सलग तीन दिवस धुवाधार पाऊस झाला. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरीही धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने विसर्ग सुरूच आहे.

नवजाला ६ हजार ७८३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर महाबळेश्वरला ६ हजार ४६२ आणि कोयनानगर येथे ५ हजार ५२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस होत असल्याने आवक सुरू आहे. यामुळे या पावसाळ्यात तिसऱ्यांदा धरणाचे दरवाजे उघडले