कोयना पाणलोट क्षेत्रात संततधार; 105 टीएमसी साठवण क्षमता असलेले कोयना धरण भरले ‘इतके’ TMC

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । गत दहा दिवसांपासून कोयना परिसराला झोडपून काढलेल्या मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी सकाळपासून कमी झाला आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 47 हजार 799 क्युसेक आहे. गुरूवारपासून उघडलेले धरणाचे सहा वक्र दरवाजे सहा फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहे. कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या कोयना धरणाची साठवण क्षमता 105 टीएमसी असून धरणात सध्या 83.50 टीएमसी पाणीसाठा आहे तर धरण 79.33 भरले आहे. धरणातून पाणी सोडल्याने जलपातळी नियंत्रित झाली आहे.

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलून सांडव्यावरून 30,000 क्युसेक्स व पायथा विद्युत गृहातून 2100 क्यूसेक्स एकूण 32,100 क्यूसेक्स पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. आज दिवसभर पावसाची संततधार असल्यामुळे कोयनेला 25, नवजाला 40 तर महाबळेश्वरला 39 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

Koyna Dam

Dated: 27/07/2024
Time: 05:00 PM
Water Level: 2145”01” (653.821m)

Dam stock:
Total: 83.50 TMC (79.33%)
Useful reserves: 78.38 TMC (78.28%)

Inflow into dam: 47 thousand 799 cusecs

Discharge- 32,100 cusecs

Rainfall in millimeters (today/till date)
Koyna- 25/3373
Navja- 40/3939
Mahabaleshwar- 39/3596