पाटण प्रतिनिधी। गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने आता पुन्हा दडी मारली आहे. दरम्यान, बुधवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला अवघा 14 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अशात पावसाअभावी कोयनेत येणाऱ्या पाण्याची आवक घटली असली तरी धरणातील पाणीसाठ्याने 84 टीएमसीचा टप्पा पार केला आहे.
कोयना धरणात सध्या 80.11 टक्के इतक्या क्षमतेने पाणीसाठा झालेला आहे. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासांत कोयनेला अवघी ५ आणि नवजा येथे ६ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर एक जूनपासून सर्वाधिक पाऊस हा नवजाला ४ हजार ६१९ मिलीमीटर झाला.
तर कोयनेला ३ हजार २२७ आणि महाबळेश्वरमध्ये ४ हजार ३०५ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४ हजार ३११ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ८४.३२ टक्के झाला होता. त्याचबरोबर मागील एक आठवड्यापासून कोयना धरणातून होणारा विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.
Date : 16/08/2023
Time : 08:00 AM
Water level : 2146′ 00″ (654.101m)
Dam Storage :
Gross : 84.32 TMC (80.11%)
Inflow : 4,311 cusecs
Discharges
KDPH : 00 Cusecs.
Total Discharge in koyna River : 00 Cusecs
Rainfall in mm : (Daily/Cumulative)
Koyna : 05/3237
Navaja : 06/4619
Mahabaleshwar : 14/4305