सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील कणसेवाडी गावच्या हद्दीत डोंगराच्या जवळ एका शेतात पिंपरणीच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत एक मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. रागाच्या भरात पूर्वीच्या भांडणातून शालीने गळफास लावून हत्या केल्या प्रकरणी वडूज पोलिसांनी एकास आज अटक केली आहे.
विजय महादेव डोईफोडे (वय ३४, रा. कणसेवाडी) असे मृत्यू झाल्याचे नाव असून अधिक बावा जाधव (रा. कणेसवाडी ता. खटाव जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खटाव तालुक्यातील कणसेवाडी गावच्या हद्दीत डोंगराच्या जवळ एका शेतात पिंपरणीच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत एक मृतदेह पोलिसांना आढळून आला. यानंतर पोलीस अंमलदार यांनी त्याठिकाणी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यांना विजय डोईफोडे याच्या डोक्यास डाव्या बाजूस व कपाळावर जखमेचे व्रण दिसून आले. तसेच त्याच्या छातीवर ओरखडलेले वन दिसून आले. शिवाय मानेवर गळफासाचा गर्द व्रण दिसले. संबंधित मृतदेह रुग्णालयात वडूज येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
त्यानंतर घटनस्थळी चप्पल व मोबाईल सोबत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने त्याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. यावेळी त्यांना घटनास्थळापासून १२ कि. मी. अंतरावरती कातरखटाव ते एनकूळ माळ शेतशिवारात मृतदेहाच्या चप्पला दिसून आल्या. त्याचा मोबाईल मिळून आला नाही. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत मोबाईलची तांत्रिक माहिती काढली. तसेच कणसेवाडी डोंगर परिसरात फिरुन घटनेच्या अनुषंगाने काही संशयित वस्तू मिळून येतात का? याची पाहणी करीत असताना मंगळवारी घटनस्थळापासून पश्चिमेस १ किमी अंतरावरती निर्जनस्थळी ट्रॅक्टरच्या टायरचे वन दिसून आले. तसेच याबाबत परिसरातही नागरिकांची चौकशी केली असताना मृत्यू झालेल्या विजय डोईफोडे हा मृत्यू होण्यापूर्वी अधिक बावा जाधव याच्यासोबत वडूज येथे दिसला होता, अशी माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी अधिक बाबा जाधव याच्या घरासमोरजाऊन तपासणी केली असता त्याठिकाणी निर्जन ठिकाणी मिळून आलेल्या ट्रॅक्टर वाहनाच्या चाकाची नकशी एकसारखी दिसून आली. संशय वळावला तसेच संशयित अधिक जाधव हा घरी नसल्याने त्याचा कातरखटाव परिसरात शोध घेवून तो मिळून येताच त्यास विचारपूस केली. त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारले असता विजय महादेव डोईफोडे याला दि. १५/०६/२०२४ रोजी ज्वारी घेऊन वडूज येथे गेलो होतो. त्याठिकाणी त्यास दारु पाजून सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कातरखटाव येथे आलो. त्यावेळी विजय डोईफोडे याने गेल्या महिन्यामध्ये त्याचे घराकडे गेल्याचे कारणावरुन बाचाबाची करुन माझी बदनामी केली. या बदनामीचा राग माझे मनात असल्याने रात्री ८ वाजण्याच्या सुमारास विजय डोईफोडे यास पुन्हा दारु पाजून एमएसईबीचे सब स्टेशनचे पाठीमागे एनकूळ रोडला माळरानावरती ट्रॅक्टरमधून गावाकडे जात असताना निर्जन ठिकाणी ट्रॅक्टर थांबवून त्याच्या गळ्यातील शालीने गळा आवळल्याची कबुली जाधव याने दिली.
तसेच विजय याला ठार मारुन त्यास ट्रॉलीमध्ये टाकून ट्रक्टर व ट्रॉली कणरोवाडी डोंगराकडेला आड रानात लावून विजय डोईफोडे यास खांद्यावरती घेऊन जावून पिंपरणीच्या झाडाला शालीने लटकविले असल्याची कबूली अधिक बावा जाधव (रा. कणेसवाडी ता. खटाव जि. सातारा) याने दिली असल्याने त्यास खूनाचे गुन्हयात पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी चुलत भाऊ गोविंद शंकर डोईफोडे याने वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग श्रीमती अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, सपोनि अमोल माने, पो.हवा. शिवाजी खाडे, पो.कॉ. गणेश शिरकुळे, पो. हवा. मल्हारी हांगे, पो.कॉ. सत्यवान खाडे, पो.कॉ. कुंडलिक कटरे, पो.कॉ. सागर बदडे, पो. कॉ. किरण चव्हाण पो.कॉ. पुष्कर जाधव, पो.कॉ. गजानन वाघमारे, पोहवा अमोल चव्हाण यांनी केली आहे.