कराड प्रतिनिधी । कराड वाहतुक शाखेच्या पोलिसांच्या वतीने बुधवारी कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कॉटेज हॉस्पिटलच्या सिग्नलवर दुचाकीसह चारचाकी वाहनधारकांवर धडक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यावेळी वाहतुक नियमांच्या निर्देशाचे पालन न करणे, विना परवाना वाहन चालविणे, ट्रीपल सीट, वाहन चालविताना मोबाईल संभाषण करणे, फॅन्सी नंबर प्लेट, नंबर प्लेट नसणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर धडक कारवाई करण्यात आली. 10 ते 15 या दोन तासाच्या वेळेत केलेल्या कारवाईतून वाहतूक पोलिसांनी तब्बल १२ हजाराहून अधिक दंड करण्यात आला.
कराड शहरातील कृष्णा नाका, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय सिग्नल चौक आदींसह शहरातील विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांच्यावतीने आज दुचाकीस्वारांवर धडक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यावेळी उपजिल्हा रुग्णालय परिसरात पोलिसांना सिग्नल तोडताना, विना हेल्मेट, ट्रिपल सीट आदी नियमांचे उल्लंघन करताना दुचाकीस्वार आढळून आले. यावेळी त्यांना ऑनलाईन दंड करण्यात आला. तर काहीकडून सुमारे बारा ते पंधरा हजार रुपये प्रत्यक्ष दंड देखील करण्यात आला.
वाहतूक पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत काहिजण वाहतुकीचा परवाना नसतं देखील वाहने चालविताना आढळून आले. त्यांना जागेवर दंड ठोठावण्यात आला. वाहतूक पोलिसांच्या धडक कारवाईच्या मोहिमुळे विनापरवाना वाहने चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.