कराडात 47 बुलेटच्या मॉडीफाय सायलेन्सरवर पोलीसांनी फिरवला बुलडोझर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । बुलेटचा अधिकृत सायलेन्सर काढून त्या जागी कानठळ्या देणारा सायलेन्सरवर कराडच्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने शुक्रवारी कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अशा बुलेटस्वारांना कारवाईचा दणका देत वाहतूक नियंत्रण शाखेने तब्बल ४७ मॉडीफाय सायलेन्सरवर बुलडोझर फिरवत ते नष्ट केले. यापुढे शहर व परिसरात प्रत्येक बुलेटची तपासणी करून मॉडीफाय सायलेन्सर जागेवरच जप्त केला जाईल, असा इशारा वाहतूक पोलिसांच्या वतीने देण्यात आला.

कराड शहरातील मुख्य बाजारपेठ, प्रीतिसंगम परिसर, मलकापुरातील आगाशिवनगर, मलकापूर रस्ता, मार्केटयार्ड रोडवर, सैदापुरात विद्यानगरीत मॉडिफाय सायलेन्सर बसवून बुलेट पळवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यावर आला बसण्यासाठी विद्यानगर येथे पोलिसांच्या वतीने शुक्रवारी हि कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे राहुल वरोटे यांनी शहरातील विविध भागात कारवाईसाठी पथके तैनात केली. त्यानंतर बुलेटसह धुमस्टाईल वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याच्या सूचनेनुसार पथकाने प्रत्येक बुलेटची तपासणी केली. आणि त्यांच्या सायलेन्सरची अधिकृत तज्ज्ञाकडून तपासणी केली. सायलेन्सर मॉडीफाय असल्याचे लक्षात येताच ते जागेवरच जप्त करण्याची कार्यवाही सुरू केली. आतापर्यत तब्बल ४७ सायलेंसर काढून घेत वाहतूक पोलिसांनी संबंधित वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. जप्त केलेल्या सायलेन्सरवर योग्य ती कागदोपत्री कारवाई करून ते शुक्रवारी बुलडोझर फिरवून नष्ट करण्यात आले.