कराड प्रतिनिधी | कराड शहरात पोलिसांच्या वतीने ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तब्बल १२ जणांची ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले असून टोळीमध्ये दोन परदेशी व्यक्तींचा देखील समावेश आहे. या आरोपींकडून १ लाख १४ हजार रुपयांचे ३७ ग्रॅम MD ड्रग्ज जप्त केले आहे. महत्त्वाचं म्हणजे हे सर्व रॅकेट हे बसेसमधून चालवले जात असायचे. बस ड्रायव्हरकडे पाकिटातून, मिठाईच्या डब्यातून हे ड्रग्ज एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी पाठवले जात असायचे.
१) राहूल अरुण बड़े, २) समिर उर्फ सॅम जावेदशेख, ३) तौसिब चॉदसो बारगिर, ४) संतोष अशोक दोडमणी, ५) फैज दिलावर मोमिन, ६) अमित अशोकघरत, ७) दिपक सुभाष सुर्यवंशी, ८) बेंझामिन अॅना कोरु, (आफ्रिकन खंड) ९) रोहित प्रफुल्ल शहा, १০)सागना इमेन्युअल, (सेनेगल देश) १৭) नयन दिलीप मागाडे, १२) प्रसाद सुनिल देवरुखकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख आणि अपर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर यांनी सातारा जिल्हयामध्ये अमली पदार्थ विरुध्द कारवाईची मोहिम अधिक तीव्र केली आहे, सदर मोहिमे अंतर्गत कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी कराड उपविभागामध्ये अंमली पदार्थ कारवाई अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे एक पथक स्थापन केले होते.
सुमारे १ महिना गोपनिय माहिती आणि तांत्रीक विश्लेषण केल्यानंतर कराड येथे सुरु असलेले गुंगीकारक आणि अंमली पदार्थाचे नेटवर्कची पाळेमुळे उद्धवस्त करण्याच्या दृष्टीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू केली होती, सदर कारवाईमध्ये सुरुवातीस कराड येथील ३ आरोपी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आणखी ४ पथके तयार करून त्यांना मुंबई, कोल्हापूर, पुणे तसेच इतरठिकाणी पाठविण्यात आले. तपासामध्ये कराड मधील ड्रग्ज नेटवर्कची लिक खुप दुरवर पोहोचल्याचे लक्षात आले. त्याअनुषंगाने मुंबई येथून २ परदेशी नागरिकांना शिताफिने अटक करण्यात आली व त्यांच्याकडून देखील ड्रग्ज जप्त करण्यात आले.
आतापर्यत सदर तपासामध्ये विविध ठिकाणाहून एकुण १२ आरोपी याना अटक करण्यात आलेली आहे. तसेच त्यांच्याकडून ३७ ग्रॅम गुंगीकारक एम.डी (मेफेड्रोन) ड्रग्ज एकुण १ लाख १४ हजार ३५० रुपये किंमतीचे जप्त करण्यात आलेले आहे. सदर कारवाईमध्ये डेटा अॅनालिसीस व गोपनिय यंत्रणा यांचा परिणामकारक वापरकेला गेला आहे. एम.डी (मेफेड्रोन) ड्र्र्ज विरोधात सातारा जिल्हयातील ही पहिलीच कारवाई असून यामुळे नशामुक्त जिल्हा या संकल्पनेला बळ मिळालेले आहे. सदर कारवाईची व्याप्ती वाढलेली असून त्यावर वेगाने तपास सुरू आहे.
सदर कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अमित बाबर, श्री. संतोष सपाटे, संताजी जाधव,असिफ जमादार, प्रविण पवार, सागर बरगे, दिपक कोळी, मयुर देशम्ख, अनिकेत पवार, वैभव पवार,संग्राम भुताळे, राजाराम बाबर तसेच कराड शहर पोलीस ठाणे कडील वपोनि राजू ताशिलदार, सपोनि राजेश माळी, अशोक भापकर, निलेश तारु,
पोउनि साक्षात्कार पाटील, सतिश आंदेलवार, दिपक वागवे,पोलीस अंमलदार श्री. अनिल स्वामी, संग्राम पाटील, उंब्रज पोलीस ठाणेकडील सपोनि श्री. रविद्र भोरे, पोलीस अंमलदार मयुर थोरात, सायबर पोलीस ठाणेचे महेश पवार, यशवंत घाडगे, प्रशांत मोरे, ओमकार डुबल, रामदास भास्करवाड, रणजीत कुंभार, रेश्मा तांबोळी यानी सहभाग घेतला, सदर प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पो. ना. सागर बर्गे यानी सरकारतर्फे फिर्याद दिलेली आहे.
सदर कारवाईमध्ये शहरामध्ये चालणाऱ्या ड्रग्ज नेटवर्कला चांगलाच दणका बसला असुन नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे, याबाबत कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी दिला आहे. नागरिकानी देखील याबाबत माहिती असल्यास स्वतः हून पुढाकार घ्यावा आण पोलीसाना देखील सहकार्य करण्याचे अवाहन केलेले आहे. मा. पोलीस अधीक्षक समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यानी सर्व पोलीस टिमचे विशेष अभिनंदन केले.