कराड शहर हद्दीतून गहाळ झालेले 26 मोबाईल पोलिसांनी केले विविध राज्यातून हस्तगत, मूळ तक्रारदारांना दिले परत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले ५ लाख रुपये किमतीचे २६ मोबाईल कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने महाराष्ट्र तसेच इतर विविध राज्यातून हस्तगत केले. आज मूळ तक्रारदारांना ते मोबाईल परत करण्यात आले.

पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकूर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर के. एन. पाटील, हे सातारा जिल्ह्यातील एक मुख्य बाजारपेठ असून पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. यातक्रारीं बाबत गांभीर्याने लक्ष देवून जास्तीत जास्त मोबाईल परत करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने के.एन.पाटील वरीष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांनी पो. कॉ. संग्राम पाटील गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना योग्य ते मार्गदर्शन करून सदरचे गहाळ झालेले मोबाईलचा तात्काळ छडा लावण्याचे आदेश दिले होते.

कराड शहर ही सातारा जिल्हातील एक मुख्य बाजारपेठ आहे. त्यानुसार कराड शहरास एक मोठी ओळख आहे. कराड शहरात आजूबाजूचे गावातून दररोज हजारोचे संख्येने लोक नोकरी, रोजगार व शिक्षण व बाजारपेठ मध्ये खरेदी करण्यासाठी कराड शहरात येत- जात असतात. त्यावेळी प्रवासात बाजारपेठेत व इतर ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे. सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून तांत्रिक माहिती प्राप्त करून सदरची माहिती पोलीस अंमलदार संग्राम पाटील यांनी तांत्रिक विश्लेषण करत महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून तसेच इतर राज्यातून मोबाईल परत मिळवत गहाळ झालेले मोबाईल तक्रारदार यांना परत केल्याने नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत कौतुक करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर,
उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक गणेश कड, पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, अशोक वाडकर, पोलीस नाईक अनिल स्वामी, पोलीस कॉन्टेबल संग्राम पाटील, मुकेश मोरे, दिग्वीजय सांडगे, अमोल देशमुख, महेश पवार, धिरज कोरडे, मोहसिन मोमीन, समीर पठाण, आनंदा जाधव, हर्षल सुखदेव, सोनाली पिसाळ तसेच सातारा सायबर सेलचे अंमलदार महेश पवार यांनी केली आहे.