कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने नवीन वर्षाची अनोखी भेट शनिवारी मोबाईल मालकांना देण्यात आली. मालकांचे चोरीस गेलेल्या 18 मोबाईलचा शोध घेऊन मुळ मालकांना परत करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहर पोलीस ठाण्यास सन 2022-2023 पासून नागरिकांचे वापरात येणारे मोबाईल फोन ठिकठिकाणी गहाळ झाले होते. त्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर व वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी कराड शहर पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्सटेबल संग्राम पाटील यांना कराड शहर हददीतील गहाळ झालेल्या मोबाईल तसेच चोरीच्या गुन्हयातील मोबाईल फोन शोधून घेवुन ते नागरीकांना परत करण्याबाबत करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे कराड शहर पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेब संग्राम पाटील, पोलीस हवालदार विजय मुळे, पोलीस कॉन्सटेबल सांडगे, मुकेश मोरे, अमोल देशमुख यांना मोबाईल फोन शोधकामी नेमणेत आले होते. नमुद पथकाने सायबर पोलीस ठाणे सातारा यांचे मदतीने कराड शहर हददीतून तसेच सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, सांगली, पुणे, मुंबई, ठाणे, कर्नाटक राज्य, मध्यप्रदेश राज्यांतुन परीसरातून चोरीस गेलेले मोबाईल फोन ताब्यात घेण्यात यश आले.
सदर मोहिम पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, स.पो.नि. गोरड, पो.नि.विभूते सो, स.पो.नि. मच्छले, पोलीस उपनिरीक्षक डांगे, पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोउनि. जगदाळे तसेच पोलीस ठाणेतील पो. कॉ. संग्राम पाटील, स.फौ. देशपांडे, पो. हवा. विजय मुळे, प्रविण काटवटे, अमोल साळूंखे, पोलीस नाईक कुंभार, सपना साळूंखे, अनिल स्वामी, मारुती लाटणे, पो.कॉ. दिग्विजय सांडगे मुकेश मोरे, अमोल देशमुख, कपील आगलावे, प्रशांत वाघमारे, हेमंत महाले, धनाजी गोडसे यांनी सदरची कारवाई कामी मदत केली आहे.