5 वर्षापासून वेषांतर करून देत होता चकवा; अखेर कराड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । एका गुन्ह्यातील आरोपी गेल्या पाच वर्षांपासून पोलिसांना चकवा देत होता. काढो तो वेषांतर करायचा तर कधी लपून-छपून पोलिसांसमोरून निघून जायचा. अशा पाच वर्षांपासून चकवा देत फिरत असलेल्या खटाव तालुक्यातील आरोपीला कराड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. साजन किर्लोस्कर शिंदे (रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड शहर पोलीस ठाण्यात खटाव तालुक्यातील साजन शिंदे याच्यावर गुन्हे दाखल होते. पोलिसांकडून त्याचा गेल्या पाच वर्षांपासून शोध घेतला जात होता. मात्र, तो कधी आपली ओळख लपवून तर कधी पेहराव बदलून ठिकठिकाणी राहत होता. सध्या तो सिद्धेश्वर कुरोली गावात असल्याची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती.

त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक राजू डांगे यांच्यासह सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, नाईक संजय जाधव, आनंदा जाधव, महेश शिंदे यांच्यासह पथकाने आरोपी साजनला पकडण्याचा प्लॅन केला. त्यानुसार ते शनिवारी पहाटे सिद्धेश्वर कुरोली या याठिकाणी दाखल झाले. पहाटेपासून त्यांनी साजनवर पाळत ठेवली. तसेच दुपारी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात तीन आणि सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.