कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलिसांच्या वतीने आज देशी बनावटीची पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील सराइत दोन गुंडास अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून शस्त्रासह एकुण 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अनिकेत पालकर व त्याचा साथीदार दिवाकर बापुराव गाडे, (वय 28 वर्षे रा. बैल बाजार रोड मलकापुर ता. कराड जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस उप निरिक्षक आर. एल. डांगे व पथकाने नुकतेच दि. 09/07/2023 रोजी एम के ऊर्फ मनोज खांडेकर या सराईत गुंडास पिस्टलसह छापा टाकुण अटक केली होती. देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडांना रडारवर घेतले होते. वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी यांच्या आदेशाने पोलीस उप निरीक्षक आर. एल. डांगे हे कराड शहरातील सर्व अड्डे पिंजून काढला.
यावेळी आज दि. 07/09/2023 रोजी एका खास खबऱ्यामार्फत त्यांना माहिती मिळाली. अनिकेत पालकर यांचेकडे देशी बनावटीचे पिस्टल आहे. आणि तो सध्या नटराज टॉकीजसमोर एका काळया रंगाच्या दुचाकीवर उभा आहे. क्षणाचाही विलंब नकरता डीबी पथक अधिकारी डांगे यांनी पथक तयार करुन नटराज टॉकीज जवळ छापा कारवाई केली. यावेळी अनिकेत पालकर व त्याचा साथीदार दिवाकर बापुराव गाडे, (वय 28 वर्षे रा. बैल बाजार रोड मलकापुर ता. कराड जि. सातारा) यास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक अग्नीशस्त्रासह एकुण 1 लाख 20 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उप अधिक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक आर.एल.डांगे यांची अवघ्या 2 महिण्यात अग्नीशस्त्राची सलग दुसरी कामगिरी आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बागंर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक डांगे, सहायक फौजदार रघुवीर देसाई, सफौ संजय देवकुळे पोलीस हवा. शशि काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदिप कोळी, पो. शि. महेश शिंदे, आनंदा जाधव, रईस सय्यद, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.