कराड प्रतिनिधी । गत महिन्यात कराड पोलिसांनी पकडलेल्या एमडी ड्रग्जच्या रॅकेटमध्ये दोन बड्या घरातील दोघा संशयितांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात अली कोटी. या संशयितांना कराड पोलिसांनी अटक केली आहे. एकास रविवारी रात्री, तर दुसऱ्यास पहाटे पुण्याच्या विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले.
सौरभ संदीप राव व सुजल उमेश चंदवानी अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. चंदवानीला पुण्याच्या विमानतळावरून अटक केली. तो परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या पथकाने शिताफीने त्यास ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमडी ड्रग्जच्या रॅकेटमध्ये या दोघांव्यतिरिक्त पहिल्या टप्प्यात तिघांना अटक झाली. त्यांच्याकडून सुमारे ३० ग्रॅम ड्रग्ज जप्त झाले. राहुल बडे (वय ३७, रा. सोमवार पेठ, कराड), समीर ऊर्फ सॅम शेख (२४, रा. आदर्श कॉलनी, कार्वे नाका) व तौसीब बारगीर (२७, रा. कार्वेनाका) यांना अटक झाली होती, तर अमित घरत (वय ३२, करंजवडे, पनवेल), दीपक सूर्यवंशी (४३, रा. चाळीसगाव, सध्या तुर्भे-मुंबई), बेंजामिन अॅना कोरू (४४ रा. कोपरखैरणे, नवी मुंबई),
रोहित शाह (३१, रा. शनिवार पेठ, कऱ्हाड), सागना मॅन्युअल (३९, घणसोली नवी मुंबई), नयन मागाडे (२८, रा. डोंबिवली पूर्व, जि. ठाणे), प्रसाद देवरुखकर (३०, पावसकर गल्ली, कराड), संतोष दोडमणी (२२, सैदापूर-कराड), फैज मोमीन (२६, रा. मार्केट यार्ड, कराड) यांना दुसऱ्या टप्प्यात अटक झाली होती. त्यांच्याकडून सुमारे १० ग्रॅम एमडी ड्रग्जसह जप्त केले आहे. यातील वरील दोघे बऱ्याच दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. रात्री त्यांना अटक करण्यात आली.