कराडात दुचाकी चोरट्यास अटक; गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी नुकतीच एका दुचाकी चोरट्यास अटक केली आहे.

राहूल मल्हारी तुपे (वय 29, रा. गांडुळ खत प्रकल्प शेजारी, मुजावर कॉलनी, शनिवार पेठ, कराड) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी चोरट्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

सहा. पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी मंगळवार दि. 2 रोजी गस्त करत असताना राहूल मल्हारी तुपे (वय 29, रा. मुजावर कॉलनी, शनिवार पेठ, कराड) यास सूर्यवंशी मळा रोड येथील विटभटटीवरुन संशयरित्या ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने दुचाकी चोरुन नेल्याची कबुली दिली. सदरची दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक गणेश कड, स.फौ. संजय देवकुळे, पो. हवा. वसीम संदे, अमित पवार, धीरज कोरडे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ, महेश पवार, समीर पठाण यांनी ही कारवाई केली.