कराडसह परिसरातील चोरीच्या 6 दुचाकीसह 2 चोरट्यांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड शहरात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. दुचाकी चोरट्यांना अटक करण्याची मागणी केली जात असल्याने कराडातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्यावतीने काल सोमवारी रात्री धडाकेबाज कारवाई करण्यात आली. यामध्ये रात्री दहा ते बारा या वेळेत पेट्रोलिंग व नाकाबंदीद्वारे तब्बल 6 दुचाकीसह 2 इसमांना ताब्यात घेण्यात आले.

या गुन्ह्यात सुनिल ताराचंद चव्हाण (वय 20, रा. उत्तर पार्ले, ता. कराड) व अमोल रूपचंद चव्हाण (वय- 26, रा. वारूंजी, ता. कराड) या संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या दुचाकींची विक्री होत असल्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून अशा दुचाकींचा शोध घेतला जात असताना पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्यासह पोलीस पथक कराड शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना दोन इसम संशयितरित्या दुचाकीवरून फिरत असताना आढळून आले. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली. पोलिसांच्या प्रश्नांना संबंधित इसमांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता 11/ 6 / 2023 रोजी त्यांनी गाडी चोरल्याचे कबूल केले.

तसेच कराड शहरात पोलीस ठाण्याच्या अभिलेखाची तपासणी केली असता कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 548/2023 भाद्रविसक 379 प्रमाणे दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केले असता त्यांनी इतर पाच मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली त्यातील चार मोटारसायकली ताब्यात घेतल्या असून एक गाडी तळबीड पोलीस स्टेशन येथे असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या मोटरसायकल पैकी कराड शहर पोलीस ठाण्यात 1, आष्टा जिल्हा सांगली येथे 1, विटा जिल्हा सांगली येथील 1 व इतर 2 मोटरसायकल बाबत माहिती घेणे सुरू आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रघुवीर देसाई करत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर व उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सफी रघुवीर देसाई, पोलीस नाईक संजय जाधव, किशोर तारळकर, आनंदा जाधव, महेश शिंदे, रईस सय्यद, अमोल देशमुख, सोनाली मोहिते यांनी केलेली आहे.