चिमुरडीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा

0
33
Case Of Rape Little Girl News (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । अल्पवयीन 8 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या खटल्यात रूवले (ता . पाटण) येथील आरोपीला कराडचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश के. एस. व्होरे यांनी आज फाशीची शिक्षा ठोठावली आहे. २०२१ साली ढेबेवाडी खोऱ्यातील रूवले गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. कराड न्यायालयाच्या इतिहासात फाशीची शिक्षा झाल्याची पहिली घटना आहे.

संतोष चंद्रू थोरात (वय 41, रा. रूवले, ता. पाटण) असे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सरकार पक्षाचे वकील ऍड. राजेंद्र सी. शहा यांनी केलेला युक्तिवाद आणि ढेबेवाडी पोलिसांनी पुराव्यासह सादर केलेले दोषारापत्र ग्राहय़ मानून न्यायालयाने आज शुक्रवारी महत्वाचा निकाल दिला.

आरोपी संतोष थोरात हा 29 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या गावातील एका अल्पवयीन मुलीला व तिच्या मैत्रिणीला शेतात घेऊन गेला होता. शेतातून परत आल्यावर त्या दोन्ही मुली आरोपी थोरात याच्या घराच्याबाहेर खेळत होत्या. काही वेळानंतर पीडित मुलीची मैत्रिण घरी निघून गेली. पीडित आठ वर्षीय मुलगी एकटी असल्याची संधी साधून आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवत रूवले गावातील निर्जनस्थळी नेले. तिच्यावर त्या नराधमाने जबरदस्तीने बलात्कार करत तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मुलीचा मृतदेह दरीत फेकून दिला. हा प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी तपास करत संशयिताला अटक केली. ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील राजेंद्र शहा यांनी युक्तिवाद केला. दरम्यान आरोपीस आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.