साताऱ्यात पराभूत उमेदवारांना सारखीच मतं कशी? जितेंद्र आव्हाडांचा निवडणूक आयोगाला सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघाची नुकतीच निकडणूक पार पडली. जिल्ह्यात पाटण विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार हर्षद कदम आणि कराड उत्तर मतदार संघाचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांना 90, 935 अशी समान मते पडली. दोघांच्या समान मतदाची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ ट्वटि करत निवडणूक केल्याचा थेट आरोप केला आहे. आता निवडणूक आयोगाकडून नेमकं काय उत्तर दिलं जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी काल आपल्या एक्स अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रात घोटाळे करताना इलेक्शन कमिशनने तारतम्यही बाळगले नाही. साताऱ्यात त्यांनी काय केले बघा, कराड उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांना 90, 935 मते मिळाली.

तसेच, पाटण मतदारसंघात सत्यजित पाटणकर यांनाही 90, 935 एवढीच मते मिळाली. तिथे गेलेली ईव्हीएम ही सख्खी भावंडे होती की काय? हास्यास्पद आहे; पण, हीच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सत्यता आहे असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

सातारा जिल्हा हरलेले उमेदवार

पाटण मतदारसंघ : सत्यजित पाटणकर – 90935 मते

कराड उत्तर : बाळासाहेब पाटील – 90935 मते

नेमकं काय घडलं?

पाटण विधानसभा मतदार संघात शिवसेनचे (शिंदे गट) विद्यमान आमदार आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सुरूवातीपासून आघाडी घेतली होती. त्यांना शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार आणि पारंपारिक विरोधक सत्यजितसिंह पाटणकर यांनी तगडी फाईट दिली. सरतेशेवटी 34 हजार 824 मताधिक्य घेत शंभुराज देसाई विजयी झाले. या ठिकाणी शंभूराज देसाई यांना एकूण 1 लाख 25 हजार 759 इतकी मते पडली. तर सत्यजित पाटणकर यांना 90 हजार 935 मते पडली आणि उद्धवसेनेचे हर्षद कदम यांना 9 हजार 626 मते पडली. तर उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र शरद पवार गटाकडून राज्याचे माजी सहकार मंत्री व विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपचे मनोज घोरपडे असा सामना रंगला. बाळासाहेब पाटील आतापर्यंत पाच वेळा कराड उत्तरचे आमदार राहिलेत. मात्र, यावेळेस त्यांचा महायुती भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी दारुण पराभव केला. उत्तरेत पंचवीस वर्षे असणारी बाळासाहेब पाटील यांच्या सत्तेला मनोजदादांनी सुरुंग लावला आहे. कराड उत्तर विधानसभा निवडणुकीत मनोज घोरपडे यांना एकूण 1 लाख 34 हजार 626 मते पडली तर बाळासाहेब पाटील यांना 90 हजार 935 मते पडली.