जळगावच्या निलेश जाधव खून प्रकरणी दोघांच्या अटकेनंतर पोलिसांकडून मुख्य संशयिताचा शोध सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जळगाव, ता. कोरेगाव येथील निलेश शंकर जाधव यांच्या खूनप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी मंगळवारी करण उर्फ भीमराव मल्हारी देवराशे, (रा. नांदगिरी) याला अटक केली. आतापर्यंत या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींची संख्या तीनवर पोहोचली आहे.

कोरेगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी या गुन्ह्याच्या अनुषंगिक माहिती दिली. तपासादरम्यान करण उर्फ भीमराव मल्हारी देवराशे याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचा समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आले आहे.

त्याचबरोबर या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या महिलेला आणि करण उर्फ भीमराव मल्हारी देवराशे याला न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती यु. ए. भोसले यांनी या महिलेस पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

या गुन्ह्याचा विविध बाजूने तपास केला जात असून यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, हे तपासात पुढे येणार आहे. मुख्य संशयित विशाल शिंदे यांच्या मागावर पोलीस पथके असून लवकरच त्याला जेरबंद केले जाईल, त्याला अटक केल्यानंतर या गुन्ह्यातील संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.