साथरोग प्रादुर्भाव टाळण्यासाठी फलटणमध्ये 5 हजार 234 कंटेनरची तपासणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पावसाळ्यामुळे फलटण शहरात अनेक ठिकाणी दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता फलटण नगर परिषदेच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत शहरातील घरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत 5 हजार 234 कंटेनरची तपासणी करण्यात आली.

फलटण शहरातील दोन हजार 871 घरांचे सर्वेक्षण आणि पाच हजार 234 कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 123 कंटेनर दूषित आढळल्याने त्या घरांमधील पाण्याचे हौद, बॅरल, पिंप रिकामे करण्यात आले.

या ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली. शहरात आतापर्यंत डेगीचे आठ रुग्ण आढळले आहेत. साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून नगर परिषदेमार्फत धूर फवारणी, गटारांची स्वच्छता, कोरडा दिवस पाळणे आणि जनजागृतीसाठी पत्रके वाटण्यात येत आहेत. नागरिकांनी घरांमधील पाणीसाठे वरचेवर रिकामे करावेत. फ्रिज वारंवार तपासावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.