सातारा प्रतिनिधी । सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पाटण (वन्यजीव) परिक्षेत्रातील मौजा खुडुपलेवाडी येथील नवीन संरक्षण कुटीचे उद्घाटन कोल्हापूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक तथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक (अतिरिक्त कार्यभार) मणिकंदा रामानुजम (भावसे) आणि कोयना उपसंचालक उत्तम सावंत यांच्या हस्ते झाले.
या महत्त्वपूर्ण संरक्षण कुटीची संकल्पना आणि यशस्वी अंमलबजावणी उपसंचालक उत्तम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. वनाधिकारी शिशुपाल पवार आणि त्यांच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही संरक्षण कुटी उभारण्यात आली आहे. संरक्षण कुटी उभारण्याचे मुख्य उद्दिष्ट वन्यजीव संरक्षणासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविणे रंगराव आणि वृक्षतोड, वन्य प्राण्यांच्या शिकारीवर नियंत्रण आणणे आहे. नवीन कुटीमुळे वन्यजीवांच्या. नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येईल. गस्तीसाठी असणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना या संरक्षण कुटीचा उपयोग होणार आहे. वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मणिकंदा रामानुजम यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक रवींद्र डेंगरे, वनक्षेत्रपाल शिशुपाल पवार यांच्या नेतृत्वाखाली वनपाल सचिन पाटगावकर, मारूती करपे, संजय अहिवळे, श्रीमती पार्वती सरगर, दीपक सोरट, अनिल कुंभार, बालाजी निकम, जाकीरहसेन देसाई, कैलास पांडे, निसर्ग मार्गदर्शक अनिल बोधे, निलेश फुटाणे, सुशांत पाटील, सागर नलवडे, सुनील पाटील सर्व वनसेवक यांनी परिश्रम घेतले.