सातारा प्रतिनिधी | भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, कोल्हापूर उपमंडळ यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारित असलेले श्री जब्रेश्वर मंदिरालगतच्या रस्त्यावरुन श्रीगणेश विसर्जनाच्या मिरवणुकी जात असतात. तरी सदर मिरवणुकीत लाउडस्पीकरचा सर्रास वापर करण्यात येतो. त्यामुळे प्रचंड ध्वनीप्रदूषण होऊन पुरातन मंदिराला हादरे बसण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच संबंधित मंदिराच्या परिसरातून जाताना लाउड स्पीकर बंद ठेवावेत अथवा आवाज अत्यंत कमी ठेवावा अथवा मिरवणूकीचा मार्ग बदण्यात यावा; असे निर्देश दिल्यानंतर फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिले आहेत.
गजानन चौक ते श्रीराम मंदिर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे साऊंड सिस्टिम वाजणार नाहीत व पारंपारिक वाद्य असतील तर अत्यंत कमी आवाजामध्ये वाजवण्यासाठी तसेच गजानन चौक ते श्रीराम मंदिर या परिसरामध्ये कोणत्याही मंडळाची मिरवणूक थांबणार नाही असे आदेश पारित केलेले आहेत.
सदरील आदेशात श्री जब्रेश्वर मंदिराला पोहोचणारी संभावित हानी टाळण्यासाठी मंदिराच्या आसपासच्या परिसरात म्हणजेच गजानन चौकातील मोदी बिल्डींग ते श्री राम मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार, फलटण या रस्त्यावर कोणतीही स्पीकर यंत्रणा वाजवण्यात येऊ नये तसेच पारंपारिक वाद्यांचा आवाज कमी ठेवणेत यावा, सदर रस्त्यावर कोणतीही मिरवणूक थांबवू नये; असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, फलटण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ अन्वये मला प्राप्त अधिकारानुसार दि. १५ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीसाठी सार्वननिक गणेशोत्सव मिरवणुकीबाबत खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश दिले आहे.