जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; ‘या’ 2 योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । नियंत्रित वातावरणातील शेती, सुक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर तसेच अनेक फळपिके आणि भाजीपाला पिकांची लागवड करणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्ग, अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासन कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविली जात आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.

जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी म्हटले आहे की, या योजनांच्या माध्यमातून काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत फळे पिकविण्यासाठी रायपनिंग चेंबर, उत्पादित मालाच्या साठवणुकीसाठी पुर्वशितकरण गृह उभारणे, प्राथमिक/ फिरते प्रक्रिया केंद्र, शितगृह, शितवाहन याशिवाय फलोत्पादन यांत्रिकीकरण घटकांतर्गत मजूर टंचाईवर मात करता यावा केले जात आहेत.

तसेच ट्रॅक्टर, पॉवर टिलर, तसेच पीक संरक्षण औजारे, शेततळे अस्तरीकरण, सामूहिक तलाव योजना, हरीतगृह उभारणी, शेडनेट हाऊस, मल्चिंग, कांदा चाळ उभारणी, क्षेत्र विस्तार घटकांतर्गत आले, हळद, ड्रॅगन फ्रूट, ब्ल्यू बेरी लागवड, अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका, तसेच डाळिंब पिकासाठी अॅंटी हेलनेट, द्राक्ष पिकाकरिता क्रॉप कव्हर इत्यादी बाबींचा लाभ सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना देण्यात येत असल्याचे फरांदे यांनी म्हंटले.

योजनेच्या लाभासाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक

या घटकांचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या Maha DBT पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. अर्ज सादर करताना जमीन मालकीचा ७/१२ खाते उतारा, आधार कार्ड, आधार संलग्न बैंक खाते पासबूक, जातीचा दाखला, इ. कागदपत्रे संकेतस्थळावर सादर करावीत. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भात व योजनाबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा.

शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून योजनेत सहभाग नोंदवावा : भाग्यश्री फरांदे

योजनेतून सर्वसाधारण प्रवर्ग, अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गातील शेतक-यांचे अर्ज सादर करणेकरिता दि. १ जून २०२४ ते १५ जून२०२४ या कालावधीत पंधरवडा मोहिम राबविण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.