जिल्ह्यातील आमदार साहेबांना सोशल मीडियात किती आहेत फॉलोअर्स?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदारकीसाठी अनेक नेतेमंडळींनी दंड थोपटले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आठ आमदारांनाही आपापल्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ९ आमदार राहतील अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार असून या निवडणुकीत जे आमदार आणि इच्छुक उभे राहणार आहेत त्यांच्याकडून सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला जात आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावर आपले अधिकृत फेसबुक पेज तयार केले असून जिल्ह्यातील आमदारांचे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि द्विटरवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत.

खासदारांचे 6 लाखांहून जास्त फॉलोअर्स…

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज असून याचे फॉलोअर्स ६ लाख २० हजारांपर्यंत आहेत. इन्स्टाग्रामवरही ३.७८ लाख फॉलोअर्स आहेत, तर एक्सवर ३.३० लाख फॉलोअर्स आहेत. राज्यसभेचे नवनियुक्त सदस्य खासदार नितीन पाटील यांचे फॉलोअर्स वाढू लागले आहेत.

नेतेमंडळींच्या कट्टर कार्यकर्त्यांकडूनही फेसबुक पेज…

नेतेमंडळींच्या अनेक कट्टर कार्यकर्त्यांकडूनही फेसबुक पेज बनवली गेली आहेत. यमध्ये संबंधित नेत्यांच्या नावाने फॅनक्लब असलेले फेसबुक पेजलाही मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत. त्याचप्रमाणे विरोधी नेत्यांचीही फेसबूक पेज आहेत. त्यालाही मोठ्या संख्येने फॉलोअर्स जोडले गेले आहेत. या पेजवर संबंधित नेत्यांच्या दैनंदिन हालचाली, बैठकांची माहिती पोस्ट केली जात असते. त्यामुळे त्यांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचण्यास मदत होत असते.

सोशल मीडिया फॉलोअर्स

१) शिवेंद्रराजे भोसले भाजप सातारा-जावली मतदारसंघ
फेसबुक : ६४,४००
इन्स्टा : ३२०३
एक्स : २०

२) शंभूराज देसाई, (शिवसेना एकनाथ शिंदे गट) पाटण मतदारसंघ
फेसबुक : ७०,५००
इन्स्टा : २७,२००
एक्स : ५,७४७

३) मकरंद पाटील, (अजित पवार गट) वाई मतदार संघ
फेसबुक : २१०००
इन्स्टा :१९१००
एक्स : ५,९८८

४) जयकुमार गोरे, भाजप, माण खटाव मतदार संघ
फेसबुक : ४०,०००
इन्स्टा : ४९,८००
एक्स : ६,३१५

५) दीपक चव्हाण (अजित पवार गट) फलटण मतदार संघ
फेसबुक : १.४००

६) शशिकांत शिंदे (शरदचंद्र पवार गट) कोरेगाव मतदार संघ
फेसबुक : १,३०,०००
इन्स्टा : ९१,४३१
एक्स : ६९,२५९

७) पृथ्वीराज चव्हाण, (काँग्रेस) कराड दक्षिण मतदार संघ
फेसबुक : २१,८००
इन्स्टा : २८,८००
एक्स : २,५८,८९४

८) बाळासाहेब पाटील (शरदचंद्र पवार गट) कराड उत्तर मतदारसंघ
फेसबुक : १२,०००
इन्स्टा : १२,१००
एक्स : ५,५६२

९) डॉ. अतुल भोसले (भाजप) कराड दक्षिण मतदार संघ
फेसबूक : 1 लाख 5 हजार
इन्स्टा : 31 हजार 600
ट्विटर : 1 हजार 23