कराड प्रतिनिधी | कराड शहरासह तालुक्याला गारांसह वळीवाच्या पावसाने आज दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास चांगलेच झोडपून काढले. दोन तासात कराड शहरात गारांसह पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष, फांद्या कोसळले. काही ठिकाणी रस्त्याकडेला लावण्यात आलेले जाहिरातीचे बॅनर फाटून खाली पडले तर वीज पुरवठा देखील तत्काळ बंद झाला.
सकाळपासूनच सातारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण झाले होते. आज दुपारी साडे तीन वाजल्यापासून कराड शहरात ढगाळ वातावरणामुळे कमालीचा उकाडा जाणवू लागला होता. वादळी वातावरणातील वाऱ्याची गती आणि मेघांच्या दाटीवरून पावसाच्या प्रमाणाचा अनुमान लावला जात असताना पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह अचानक वळीवाच्या पावसाला सुरुवात झाली.
त्यामुळे काही मिनिटात शहरातील वीज पुरवठा देखील बंद झाला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील भाजी विक्रेत्यासह इतर विक्रेत्यांची एकच तारांबळ उडून गेली. शहरातील रस्त्यावरील वाहने कमी होऊन रस्ते ओस पडले.
पावसामुळे शेतकऱ्यांवर परिणाम…
विशेषतः ज्या भागात हळद आणि उसाचे पीक आहे तेथे. या पावसामुळे चांगला फायदा होऊ शकतो, मात्र काही गवताळ भागात संचाराचे अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आम्ही सर्वाना काळजी आणि सावधपणे काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.