पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाची कालपासून जोरदार बॅटिंग सुरु आहे. गेल्या 24 तासात कोयना धरण परिसरात 133 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वर परिसरात 102 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून कोयना धरणात गेल्या 24 तासात 2 टीएमसीची पाण्याची वाढ झाली असून, एकूण पाणीसाठी हा 23 टीएमसी झाला आहे.
सध्या कोयना धरणात 21000 क्युसेक्सने पाण्याची आवक सुरु आहे. कोयना धरणात गेल्या 24 तासात 2 टीएमसी पाणी वाढले आहे. सध्या कोयना धरणात 23 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरण हे 105 टीएमसी क्षमतेचे धरण आहे. धरण परिसरात जर असाचा चांगला पाऊस सुरु राहीला तर धरणाच्या पाणीसाठ्यात लवकरच मोठी वाढ होणार आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही सातारा जिल्ह्याच मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
सातारा जिल्ह्यासाठी हवामान विभागानं आज पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.