पाटण प्रतिनिधी । जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सक्रीय झाला असून गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 23, नवजा 28 आणि महाबळेश्वरला 25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. धरणात सध्या 17.07 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. मागील आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी झाले होते. पश्चिमेकडील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजासह महाबळेश्वर भागातही तुरळक स्वरुपात पाऊस पडत होता. यामुळे पावसाचा जोर कधी वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असतानाच मागील दोन दिवसांपासून पश्चिम भागात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे.
एक जूनपासून आतापर्यंत 579 मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर नवजाला आतापर्यंत 793 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. महाबळेश्वरलाही 24 तासांत 23 तर जून महिन्यात आतापर्यंत 520 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. पश्चिम भागात पाऊस होत असल्याने प्रमुख धरणांतही हळूहळू पाण्याची आवक होऊ लागली आहे. कोयना धरणातही आवक वाढत चालली आहे.
मागील आठवड्यापासून धरणात पाणी येत असल्याने धरणसाठ्यात थोडी वाढ झाली आहे. तर सध्या धरणातील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. सातारा शहरातही मंगळवारपासून पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक दिवसानंतर शहरवासियांना पावसाचा सामना करावा लागला. तर बुधवारी सकाळच्या सुमारासही रिमझिम स्वरुपात पाऊस पडला. त्यानंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते.
Koyna Dam
Date: 27/06/2024
Time: 08:00 AM
Water level: 2048”02” (624.281m)
Dam Storage:
Gross: 17.07 TMC (16.22%)
Live: 11.95 TMC (11.93%)
Inflow : 4482 Cusecs.
Discharges
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 23/602
Navaja- 28/793
Mahabaleshwar- 25/520