पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाण्याची आवकही वाढली आहे. सोमवार दि. 8 रोजी सकाळी आठपर्यंत एकूण 30.84 टीएमसी इतका पाणीसाठा धरणात निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून पश्चिम भागात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. महाबळेश्वर, सातारा, पाटण व जावळी तालुक्यांत पावसाचा जोर आहे. कराड, वाई तालुक्यांत पाऊस सुरू असून पश्चिम भागातील तालुक्याच्या परिसरात शेतात पाणी साचले आहे. ओढ्या, नाले वाहू लागले आहेत. भात लागवडीस वेग आला आहे. दुष्काळी माण, खटाव, फलटण, खंडाळा व कोरेगाव तालुक्यात तुलनेत पाऊस कमी आहे.
गेल्या चोवीस तासांत कोयना धरण क्षेत्रात 73, तर नवजा 112 व महाबळेश्वर 51 येथे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणात 18,125 क्युसेक पाण्याची आवक आहे. या आवकेमुळे धरणात अडीच टीएमसी वाढ झाली आहे. इतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. यामध्ये धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी तसेच तारळी येथे चांगला पाऊस झाला आहे. यामुळे याही धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सहा प्रमुख धरणात 28 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
Koyna Dam
Date : 08/07/2024
Time : 08:00 AM
Water level : 2078’01” (633.400m)
Dam Storage :
Gross : 30.84 TMC (29.30%)
Live : 25.72 TMC (25.68%)
Inflow : 18,125 Cusecs.
Discharges
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm – (Daily/Cumulative)
Koyna – 73/1538
Navaja – 112/1670
Mahabaleshwar – 51/1299