पाटण प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना पाटण विधानसभा मतदार संघात कमी मताधिक्य मिळाले. त्यांच्या घटलेल्या मताधिक्याची जबाबदारी स्वीकारत काल पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी “मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे,” अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे विधान केले. त्यांच्या या विधानावरून आता उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी देसाई यांच्यावर निशाणा साधला आहे. “मंत्रिपद सोडण्याचा हा देसाईंचा फार मोठा स्टंट आहे. त्यांनी जे गद्दारीकरून मंत्रिपद मिळवले ते त्यांच्याकडून सुटणे अशक्य आहे,” खरोखर स्वाभिमानी असतील तर त्यांनी राजीनामा देऊन दाखवावे, अशा शब्दात कदम यांनी टीका केली आहे.
हर्षद कदम यांनी आज सोशल मिडियावर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली असून त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की , “त्यांना महायुतीच्या उमेदवाराला लीड देता आले नाही, हे त्यांचे अपयश आहे आणि मंत्रिपद सोडण्याचा हा त्यांचा फार मोठा स्टंट आहे. त्यांनी जे गद्दारीकरून मंत्रिपद मिळवले ते त्यांच्याकडून सुटणे अशक्य आहे,” खरोखर तुम्ही स्वाभिमानी असाल तर राजीनामा देऊन दाखवावे, असे आव्हान त्यांनी देसाई यांना दिले आहे.
शंभूराज देसाईंवर ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षाची सडकून टीका; म्हणाले, गद्दारी करून मिळवलेलं मंत्रीपद… pic.twitter.com/8XyZFsfORF
— santosh gurav (@santosh29590931) June 9, 2024
“तुमच्या पाटण मतदारसंघात तुम्ही केलेल्या खोट्या व कागदोपत्री विकासकामांची ही पोच पावती आहे. छोट्या निवडणुकीत तुम्ही पैसे वाटून विजय मिळवला. पण लोकांच्या मनात काय आहे? हे या निवडणुकीने तुम्हाला दाखवून दिले आहे. आता येणाऱ्या चार महिन्यातील विधानसभा निवडणुकीत लोकच तुम्हाला राजीनामा देण्यास भाग पडतील, कारण तुमचे सगळे काम तुमचा स्वतः चा विकास करण्यासाठी आहे हे लोकांनी ओळखले आहे, असे कदम यांनी म्हंटले आहे.
स्वाभिमानी असतील तर देसाई राजीनामा देतील : हर्षद कदम
पाटण येथे नुकताच कार्यकर्त्याचा मेळावा घेऊन त्यामध्ये पालकमंत्री असलेल्या शंभुराज देसाई यांनी आपल्याला मंत्रिपद नको, लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांना पाटण तालुक्यातून मताधिक्य घटले याचे शल्य आहे. मी खुर्चीला चिटकून बसणारा कार्यकर्ता नाही, असे म्हंटले आहे. त्यांना मी आव्हान केले आहे की खरोखर ते जर स्वाभिमानी असतील तर त्यांनी राजीनामा देऊन दाखवावा, अशी माहिती हर्षद कदम यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.