शिरवळला महामार्गालगत एका अपार्टमेंटमधील गोडाऊनमधून 60 लाखांचा गुटखा जप्त

0
557
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एका अपार्टमेंटमधील गोडाऊनमधील ६० लाखांहून अधिक रकमेचा गुटखा व पान मसाल्याचा अवैध साठा पोलिसांनी जप्त करून कारवाई केली. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

याबाबात अधिक माहिती अशी की, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शिरवळ येथील एका अपार्टमेंटमधील गोडाऊनमधील ६० लाखांहून अधिक रकमेचा गुटखा व पान मसाल्याचा अवैध साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी पथकासह संबंधित ठिकाणी धाड टाकत गुटखा जप्त केला.

पोलीस निरीक्षक नलावडे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक विश्‍वास सिद, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त तुषार शिंगाडे, त्यांचे सहकारी व पोलिस पथकाने ही धडक कारवाई केली. यामुळे अवैध साठा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.