‘माझी लाडकी बहीण योजने’च्या अंमलबजावणीसाठी याशनी नागराजन यांच्याकडून मार्गदर्शक सुचना जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना सातारा जिल्ह्यामध्ये महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच कुटुबातील त्यांची भुमिका मजबुत करण्यासाठी ही योजना शासनामामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार महिला यांच्या कडून विहीत कालमर्यादेत अर्ज प्राप्त करून सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दीड हजार प्रतिमाह त्यांचे बँक खात्यावर DBT व्दारे महिला व बाल विकास विभाग, सातारा या कार्यालयामार्फत वर्ग करण्यात येणार आहेत. या करिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार 1) ग्रामस्तरावर ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, नागरी सेतु केंद्रातील प्रतिनिधी, समुदाय संसाधन व्यक्ती यांची समिती गठीत करण्यात यावी. 2) नारीशक्तीदूत अॅपदावरे Online अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी व लागणारा कालावधी विचारात घेता तसेच अर्ज भरण्यासाठी होणारी गर्दी टाळता यावी यासाठी ग्रामस्तरावर Offline पद्धतीने पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्यात यावे, यासाठी ग्रामपंचायतीमध्ये वार्ड निहाय कॅम्पचे आयोजन करावे. 3) Offline पद्धतीने प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या Hard Copy ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका यांचे ताब्यात ठेवण्यात याव्यात.

4) गावपातळीवर प्रत्येक दिवशी प्राप्त होणान्या Offline व Online अर्जाची माहिती शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या excel Sheet मध्ये दैनदिन स्वरुपात अद्यावत करावयाची आहे. 5) गावपातळीवर आठवड्याभरात प्राप्त झालेल्या सर्व अर्जाची नोंद Excel Sheet मध्ये केल्यानंतर प्रत्येक शनिवारी सदर पात्र लाभार्थ्यांच्या यादीचे चावडी वाचन करण्यात यावे व अर्जदाराच्या पात्रतेबाबत खातरजमा करणेत यावी. 6) गावपातळीवर Olline पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जाची दैनदिन स्वरुपात ग्रामसेवक, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, नागरी सेतु केंद्रातील प्रतिनिधी, समुदाय संसाधन व्यवती यांनी Online पद्धतीने नारीशक्ती दूत अॅपमध्ये काटेकोरपणे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

7) या योजनेतंर्गत Online फॉर्मसाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका, नागरी सेतु केंद्रातील प्रतिनिधी, समुदाय ससाधन व्यक्ती यांना परिपूर्ण फॉर्म भरणे करिता रु 50/- प्रमाणे प्रती लाभार्थी प्रोत्साहन भत्ता शासनामार्फत अदा करणेत येणार आहे. 8) आधारकार्ड वरील माहिती योजनेच्या फॉर्ममध्ये तंतोतंत भरावी. नारीशक्ती दूत अॅपमध्ये लाभार्थी महिलेचे नाव,जन्म दिनांक, संपुर्ण पत्ता भरताना त्यांच्या आधारकार्डवर जसे नमुद आहे त्याप्रमाणेच भरणे अनिवार्य आहे. 9) आधारकार्डवर जन्मदिनांक उपलब्ध नसल्यास जन्म दाखल्यावरुन जन्मदिनांक घेण्यात यावा. यामध्ये बॅंक खातेबाबत आधारकार्डवरील नमुद नावाप्रमाणेच बँकेचे खातेवर नाव असलेची खात्री करावी, तसेच आधारक्रंमाक बँकेशी संलग्न असलेबाबतची पडताळणी करुनच नारीशक्ती दुत अॅपमध्ये Online पद्धतीने माहिती भरावी.

10) गावपातळीवर Offline पद्धतीने अर्ज भरण्यासाठी या परिपत्रकासोबत जोडलेल्या अर्जाचा नमुना (Hard Copy) पुरेशा प्रमाणात ग्रामपंचायतस्तरावर उपलब्ध राहतील याची दक्षता घ्यावी. तालुका सनियंत्रण समितीमार्फत पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारकांच्या गावनिहाय यादया तसेच इतर शासकीय योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिला लाभार्थ्यांच्या गावनिहाय यादी ग्रामस्तरीय समितीला तात्काळ उपलब्ध करुन देण्यात याव्यात. 12) ग्रामसभा, महिला सभा मध्ये सदर योजनेची प्रसिध्दी करावी, ग्राम सेवकांनी गावामध्ये योजनेबाबत दवंडी दयावी व माहिती फलक लावावेत तसेच प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर दर्शनी भागावर योजनेच्या माहितीचा फलक लावण्यात यावा. सर्व पात्र लाभार्थी महिलांना नारीशक्ती दुत अॅप त्यांचे मोबाईलमध्ये Download व Online पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी प्रवृत्त करावे, अशा मार्गदर्शक सूचना नागराजन यांच्याकडून जारी करण्यात आल्या आहेत.