पाटणमध्ये ‘यशदा’ कडून आपत्ती व्यवस्थापनबाबत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण शिबीरातून मार्गदर्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । जिल्हा आपत्ती प्राधिकरण, सातारा व यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण पंचायत समितीमध्ये गुरुवारी आपत्ती व्यवस्थापन शिबिर पार पडले. पाटण तालुक्यात नैसर्गिक आपत्तीपासून जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी प्रशासानाच्या वतीने आपत्तीपूर्व तयारी व उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

पाटण तालुक्यात नैसर्गिक आपत्तीपासून जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी प्रशासानाच्या वतीने आपत्तीपूर्व तयारी व उपाययोजनांबाबत पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनील गाढे यांच्या मार्गदर्शनखाली प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी तहसीलदार अनंत गुरव, ‘यशदा’चे लखन गायकवाड, अक्षय चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आपत्तीकाळात घटनेची माहितीची तत्काळ देवाणघेवाण करणे, दरडग्रस्त भागात जमीन व इतर लक्षणांची पाहणी करणे, पूरजन्य भागात प्राथमिक सूचना देणे, आरोग्य यंत्रणा तयार ठेवणे, धोकादायक घर मालकांना नोटीस देणे, निवारा शेड व शाळा याठिकाणी सोयी तयार करणे, जनावरांची काळजी घेणे आदी विषयांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन ‘यशदा’च्या प्रतिनिधींनी केले.

डोंगरी भागात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण होत असतो. या पार्श्वभूमीवर भूजलाचे निरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. आसपासच्या विहिरी, विंधन विहिरी (बोअर) जर ३ तासांहून अधिककाळ ओसंडून वाहत असतील, तर ही दरड कोसळण्याची चाहूल समजावी. अचानक अनेक नवीन झऱ्याऱ्यांचा उगम आढळत असेल, झऱ्याच्या प्रवाहामध्ये पाचपट अथवा अधिक वाढ झालेली दिसत असेल; अथवा झऱ्याच्या पाण्याचे तापमान हे नैसर्गिक तापमानापेक्षा साधारण ५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक भासत असेल, तर ही धोक्याची घंटा समजावी, असे देखील प्रतिनिधींनी सांगितले.

दरड कोसळ्यापूर्वी ‘हे’ मिळतात संकेत

  • अतिवृष्टीने विद्युत खांब, तारांची कुंपणे, कलणे व तिरके होणे.
  • पक्षी व जनावरांच्या वर्तणुकीमध्ये अचानक बदल होणे.
  • वेगळा आवाज काढणे, किकाळणे, पायांनी जमीन उकरणे, पक्षी एकत्रित येणे.
  • घरातून जमिनीतून पाण्याचे पाझर, उफळा फुटणे: अथवा झरे निर्माणहोणे.
  • घरातील फरशा उचकटणे, जमिनीला नवीन ठिकाणी पाझर फुटणे.
  • नियमितच्या झऱ्यातून अचानक गढूळ पाणी येणे.
  • भात खाचरांना भेगा पडणे.