कराड प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज कराड शहरात शाळेच्या विद्यार्थ्यांच्यावतीने शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास आमदार बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “छत्रपतींच्या मनातले स्वराज्य स्थापन करण्यासाठी कटिबद्ध राहू,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी कराड लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील(काका), उदय हिंगमीरे, सौरभ पाटील, जयंत बेडेकर, गंगाधर जाधव, रविंद्र मुंढेकर, भारत थोरवडे, भरत वास्के, मंगेश वास्के, राकेश शहा, अमोल सोनवणे, महंमद आवटे, बलराज पाटील, भरत जाधव, सतिष भोंगाले, सोहेब सुतार प्रमोद शिंदे तसेच असंख्य शिवभक्त उपस्थित होते.
छत्रपतींच्या मनातले स्वराज्य स्थापन करण्यासाठी कटिबद्ध राहू : आ. बाळासाहेब पाटील pic.twitter.com/mCyHqUhr5d
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) February 19, 2024
यावेळी आमदार पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्रामध्ये लोकशाहीभीमुख असा राज्यकारभार सुरू झाला. सर्व अकरा पकड जातींना छत्रपती शिवाजी महाराजांनी बरोबर घेतलं व लोकांच्या मनातील स्वराज्य निर्माण केले. त्यांचा आदर्श घेऊन अनेक मंडळी देशांमध्ये विशेषतः राज्यांमध्ये कार्यरत आहेत आणि तो विचार पुढे नेण्याची भूमिका सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये सातत्याने असते. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.