कराड प्रतिनिधी | कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे माजी मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांच्या जनसुविधा 2022/23 योजनेच्या माध्यमातून कराड तालुक्यातील कालगाव येथील स्मशानभूमीतील कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सुमारे 3 लाख रुपये निधीतून कामे केल्याबद्दल कालगाव ग्रामस्थांच्यावतीने आ. पाटील यांचे आभार मानण्यात आले.
कालगाव येथील स्मशानभूमी कामाची कराड पंचायत समितीचे माजी सदस्य रमेश भाऊ चव्हाण, लोकनियुक्त सरपंच सोमनाथ चव्हाण (भाऊ), उपसरपंच योगेश चव्हाण, ग्रा. प. सदस्य धीरज पवार, ज्येष्ठ नेते दिलीप दादा चव्हाण, जयवंत चव्हाण बापू, माजी चेअरमन आनंदराव चव्हाण, संचालक हणमंत चव्हाण यांच्या वतीने नुकतीच करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
कालगाव येथे स्मशानभूमी परिसरात गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य याच्या वतीने अनेक विकासकामे करण्यात आली आहे. स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण, पाण्याची सुविधा आदी कामे गावातील लोकप्रतिनिधींनी केली आहेत. तसेच गावातील सामाजिक, धार्मिक कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात गावात साजरे केले जातात. यामध्ये गावातील सार्वजनिक तरुण मंडळ, ग्रामस्थ मोठ्या हिरीरीने सहभागी होतात. गावातील महत्वाच्या विकास कामापैकी एक असलेल्या स्मशाभूमीतील सुविधांच्या प्रश्नांबाबत गावातील ग्रामस्थांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी मागणीची दखल घेत निधी मंजूर केला. त्या निधीतून गावातील स्मशानभूमीतील काँक्रिटकरण काम पूर्ण करण्यात आले.