कराड प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील कराड तालुका परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे गुन्हे करणाया ७ जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे.
टोळी प्रमुख १) शुभम शंकर काकडे, (वय २४, रा. शिवाजीनगर मलकापुर, ता. कराड जि. सातारा) तसेच टोळी सदस्य २) समीर ऊर्फ सॅम नुरमोहंमद मोमीन, (वय २९, रा. मुजावर कॉलनी, ता. कराड जि. सातारा) ३) विजय बिरु पुजारी, (वय २३, रा. यशवंतनगर मलकापुर ता. कराड जि सातारा) ४) अल्फाज कासीम शेख, (वय २४, रा. मोरया कॉलनी मलकापुर ता. कराड जि सातारा) ५) अकीब लियाकत पठाण, (वय २४, रा. मलकापुर ता. कराड जि सातारा) ६) प्रसाद ऊर्फ बंटी अशोक गाडे, (वय ३१, औदुंबर कॉलनी, मलकापुर ता. कराड जि सातारा) ७) अक्षय दिलीप धुमाळ, (वय २९, तुळजाईनगर मलकापुर ता. कराड जि.सातारा) अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांच्यावर सातारा जिल्हयामध्ये खुन करणे, दरोडा टाकणे, खुनाचा प्रयत्न करणे, दंगा मारामारी करुन मारहाण करणेबाबतचे शरिराविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने कराड तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी व्ही.टी. पाटील, पोलीस निरीक्षक, कराड तालुका पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पुर्ण सातारा जिल्हा, तसेच सांगली जिल्हयातुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकुर यांनी केली होती.
यातील टोळीमधील इसमांना दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर कायदेशिर कारवाई करुनही ते जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांचेवर वेळोवेळी अटक, प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेवर झाला नाही अगर त्यांचे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसुन ते सातत्याने गुन्हे करीत होते तसेच त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्याने त्यांचा लोकांना फार मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता, अशा गुन्हेगारांवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
वरील टोळीस पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासमोर सुनावणी होवुन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पूर्ण सातारा जिल्हा, तसेच सांगली जिल्हयातुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे. नोव्हेंबर २०२२ पासुन १७ उपद्रवी टोळयांमधील ५८ इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, कराड तालुका पोलीस ठाणेचे पोहवा सज्जन जगताप, पो. कॉ. प्रफुल्ल गाडे यांनी योग्य पुरावा सादर केला.