Crime News: फलटण खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | फलटण शहर पोलीस स्टेशन येथे सुमारे 6 दिवसापुर्वी खुनाच्या गुन्ह्याची घटना घडली होती. या घटनेतील फरारी आरोपीस असलेल्या दुसऱ्या आरोपीस फलटण ग्रामीण पोलीसांनी शिताफीने पकडले. राहूल उत्तम इंगोले रा. लोहगाव पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हदीमध्ये दिनांक १९/०९/२०२३ रोजी विडणी ता. फलटण गावचे हद्दीत निरा उजवा कॅनॉल मध्ये अनोळखी मयत मिळून आले होते. तपासामध्ये सदरचे मयत हे फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अजित बुरुगले याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे अनोळखी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

तपासामध्ये सदरचा गुन्हा फलटण शहर पोलीस ठाणे येथे घडल्याने वर्ग करण्यात आलेला होता. सदर गुन्हयांतील आरोपी करण विठ्ठल भोसले यास फलटण शहर पोलीसांनी पकडले होते. तेव्हापासून गुन्हयातील दुसरा आरोपी राहूल उत्तम इंगोले रा. लोहगाव पुणे हा फरारी होता. फलटण
ग्रामीण पोलीस स्टेशनची टीम सदर आरोपीच्या मागावर होती त्याप्रमाणे गोपनीय व तांत्रिक विश्लेषण करुन
आरोपीस ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्हयांची कबुली दिली आहे. त्याप्रमाणे आरोपीस पुढील तपासकामी फलटण शहर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात दिले आहे.

सदरची कामगीरी पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापूसाहेब बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण राहुल धस यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस नाईक, नितिन चुतरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पोलीस कॉस्टेबल श्रीकांत खरात, हनुमंत दडस यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.